Wednesday, 21 September 2016

WhatsApp पाठोपाठ Google 'आल्लो'

WhatsApp पाठोपाठ Google 'आल्लो'

एखाद्या वनव्यासारखं सोशल मिडियात ताकदीनं टिकून असलेल्या आणि तरुणाईचं सबकूछ असलेल्या व्हॉट्स अॅपची ही जादू पाहून गूगलसारख्या दिग्गज कंपनीनेही अखेर बुधवारी आल्लो म्हणत Allo नावाचं अफलातून मेसेजिंग अॅप लाँच केलंय. म्हणजे फक्त टाइमपास किंवा एखादा फोटो, व्हिडिओ किंवा फाइल पाठवण्यापलिकडेही कितीतरी महत्त्वाचे ऑप्शन्स गूगलने या अॅप्लिकेशनमधून दिलेत. याची खासियत म्हणजे हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर Google Assistant वापरताना आयफोनमधील सिरीची आठवण व्हावी, तसं इंटरॅक्टिव वाटतं. (Smart replies- The smart replies feature allows users to select options from given suggestions. The app learns to give more suggestions based on a user’s usual replies.)
हे अॅप इन्स्टॉल करताच समोरुन कुणीतरी चॅट करतंय की काय, असा भास व्हावा तसं ते तुम्हाला एक एक पर्याय शिकवत पुढे जात असतं. तेही तुमच्या कलेकलेनं.
म्हणजे तुम्हाला रिमाइंडर लावायचा असेल तर त्याला वेळ सांगितली की, आपण पुढच्या ऑप्शन्सकडे निघून जातो. आणि ठरलेल्या वेळेत अलार्म वाजायला सुरुवात होते. What can you do, attractions nearby, Play a game, Show me my emails, Sports News, Movie showtimes, I'm bored असे कित्येक पर्याय समोर असतात. समजा I'm bored वर चॅट केलं तर समोरुन एखादा जोक (इंग्रजीतून) सांगितला जातो. (त्यातले बरेच डोक्यावरुन जाऊ शकतात.) एखादा कॉमेडी व्हिडिओ, हवे तेवढे जोक्स असा काय काय आपल्यापुढे येत जातं. म्हणजे चॅटिंग करताना समोर कुणी पाहिजेच, असंही नाही. तुम्ही हवं तेव्हा हवं ते अगदी ऑर्डर केल्यासारखं मिळवता.

फक्त चॅट म्हटलं तर स्टिकर्स वगळता बाकी बरचसं व्हॉट्स अॅपसारखंच आहे. फोटो, व्हिडिओ, कॅमेरा, अॅटेचमेंट्स, ऑडिओ सारंकाही आहे. वेगळेपण आहे ते Assistant चं. दोन मित्र एकमेकांशी चॅट करताहेत आणि मध्येच एखादा शब्द अडला किंवा एखाद्या ठिकाणचं महत्त्वं, माहिती हवी असेल तर लगेच @google टाइप केलं की, असिस्टंट हजर. मग तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही विचारायची, तीने दिलेली माहिती तुम्ही ज्या मित्राशी किंवा मैत्रीणीशी चॅट करताय, त्याच्याशी शेअर होईल. एखादं शहर, पुस्तक, कविता असो की आवडीचा कुठलाही विषय, दोघांत तिसरा (Google Assistant) आणता येईल. Play Store मध्ये Google Allo टाइप केलं ते App Install करा. मोबाइल नंबर, नाव, प्रोफाइल फोटो टाकला की तुम्ही पण आल्लो म्हणायला तय्यार☺👍.

गेल्याच आठवड्यात Google ने Duo (ड्युओ) हे व्हिडिओ चॅट अॅप्लिकेशन लाँच करत IMO सारख्या व्हिडिओ चॅट अॅप्लिकेशन्ससमोर पर्याय उभा केला होता आणि आता मेसेजिंग अॅप्लिकेशन लाँच करत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या तंत्रज्ञानाच्या गतीमान वाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्यांना दणका देत पुन्हा एकदा आपलं प्रस्थ कायम असल्याचंच दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.
------------------------------











Google Allo, a smart messaging app that helps you say more and do more. Express yourself better with stickers, doodles, and HUGE emojis & text. Allo also brings you the Google Assistant, preview edition.

 

No comments:

Post a Comment