रिलायन्स Jio ने जवळपास १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा आपली 'मुठ्ठी' उघडत अगदी मोजून मापून इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना अमर्याद डेटा देत एकप्रकारे JIO जी भरके सरप्राईज दिलंय. गेले कित्येक वर्षं ग्राहकांची गरज आणि व्हॉट्स अॅपमुळे नेटचा वाढलेला वापर याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा पैसे आकारत स्वतःचे खिसे भरणाऱ्या मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मात्र Jio ला चांगलंच जमीनीवर आणलं, हेही तितकंच खरं!
कधीकाळी फारतर ९७ रुपयांत महिनाभरासाठी मिळणारा डेटा प्लॅन कंपन्यांनी थेट दिडशे रुपयांवर नेऊन ठेवला गेला आणि आता जिओ लाँच झाल्यानंतर जे वास्तववादी दर खाली आणलेत त्यावरुन आजवर किती कोट्यवधी रुपये ग्राहकांच्या जिवावर कमावले असतील याचा अंदाज यावा. भारतीयांची मानसिकता, दरयुद्ध आणि त्यात Jio बद्दल गेल्या काही दिवसांपासून मुद्दामहून जे काही मेसेज कोणतिही सत्यता न पडताळता पोस्ट होताहेत, त्यातलं वास्तव पाहता हा खोडसाळपणाच वाटावा इतका आततायीपणा त्यातून दिसतो. तुमचा IMEI कंपनीला समजेल, तुम्हाला अमूक बिल येईल, तुमचा मोबाईल दुसऱ्या सीमने चालणार नाही, पहिला स्लॉट म्हणजे त्यांना हवे ते बदल ते करू शकतात अशा कितीतरी अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियामधून धो-धो वाहताहेत.
मुळात Jio Welcome Offer असो की Jio Preview Offer यात ग्राहकांना सरळ प्री-पेड सीमकार्ड दिले जाताहेत आणि प्री-पेडचं बिल कसं येईल, हा मुद्दाच इथं येत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे IMEI अर्थात International Mobile Equipment Identity चा. प्रत्येक कम्प्युटरला जसा आयपी किंवा त्याचा स्वतःची ओळख पटविणारा क्रमांक (प्रॉडक्ट कोड) असतो तसाच तो प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिवाइसलाही असतो. (उदा. टीव्ही, राऊटर्स, लॅपटॉप इ.) वायरलेस तंत्रज्ञानात हा को़ड युजर्सची (वापरकर्ता) ओळख असतो. डिजीटल कम्युनिकेशनमध्ये त्याची गरज असतेच, किंबहुना या कोडशिवाय सेवा पुरवणं शक्य होत नाही. एवढंच नव्हे तर केवळ याच आयएमइआय वा आयपी अॅड्रेसद्वारे कॉल्स वा इंटरनेटद्वारे एखादं बेकायदा कृत्य घडलंच तर पोलिस वा संबंधित यंत्रणेला त्यामागील दोषीपर्यंत पोहोचणं सहज शक्य होतं. मोबाईलचा हा IMEI ग्राहकाने दिला नाही तरीही तो कोणत्याही सेवा पुरवठादार कंपनीच्या मुख्य यंत्रणेत मोबाईल नंबर व सीम कार्डच्या क्रमांकासोबतच नोंद झालेला असतो. त्यामुळे उगाचच फिरणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड न केलेल्याच बऱ्या. मोबाईलचा पहिला स्लॉट हा मूळात सर्वाधिक क्षमतेच्या वापरासाठी दिलेला असतो. म्हणजे मोबाईल फोर-जी असेल तर फोरजी साठीची सेटिंग डेटा वापर आणि कॉल्स या सर्व सेवांसाठी पहिल्या स्लॉटला प्राधान्य असतं आणि महत्त्वाचं म्हणजे अन्य सीमसारखंच हेदेखील सीम काढून तुम्ही प्रसंगी दुसरं सीम टाकू शकता. त्यामुळे कुणी एखादी कंपनी तुमचा मोबाईल ब्लॉक करेल, अशी भिती बाळगण्याची गरज नाही. कुणी परस्पर असा मालकीहक्क गाजवू शकत नाही आणि तसा कुणी प्रयत्न केलाच तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कार्यरत आहेच!

No comments:
Post a Comment